फेसबुकच्या व्हॉट्स अॅपला चॅलेंज देण्याच्या तयारीत गूगल

इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी गूगलनं असाच एक मॅसेजिंग अॅप तयार केलंय. गूगल याला भारतासह इतर देशांमध्ये वापरतील. यासंदर्भात रेकीसाठी कंपनीनं आपल्या टॉप प्रॉडक्ट मॅनेजर निखिल सिंघलला भारतात पाठवला. गूगल मॅसेंजर अॅपशी निगडीत सुत्रांनी सांगितलं की, हे अॅप आताही डेव्हलप होतंय आणि २०१५मध्ये हे लॉन्च होण्याची शक्यता आहे. गूगलच्या प्रवक्त्यानं आता याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिलाय.

Updated: Oct 3, 2014, 05:58 PM IST
फेसबुकच्या व्हॉट्स अॅपला चॅलेंज देण्याच्या तयारीत गूगल title=

बंगळुरू: इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी गूगलनं असाच एक मॅसेजिंग अॅप तयार केलंय. गूगल याला भारतासह इतर देशांमध्ये वापरतील. यासंदर्भात रेकीसाठी कंपनीनं आपल्या टॉप प्रॉडक्ट मॅनेजर निखिल सिंघलला भारतात पाठवला. गूगल मॅसेंजर अॅपशी निगडीत सुत्रांनी सांगितलं की, हे अॅप आताही डेव्हलप होतंय आणि २०१५मध्ये हे लॉन्च होण्याची शक्यता आहे. गूगलच्या प्रवक्त्यानं आता याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिलाय.

गूगलच्या इतर सुविधा जशा जी-मेल आणि गूगल प्लससारखं हे मॅसेंजर यूजरला गूगलशी निगडीत इतर लॉग इनचा वापर करण्यासाठी बंधनकारक नसेल. कंपनीनं या अॅपमध्ये भारतीय भाषांना टाकणे आणि आवाजाला टेक्स्टमध्ये बदल करून मॅसेज करण्यासारख्या सुविधांचा समावेश करण्याचा प्लान तयार केलाय. हे अॅप सुद्ध व्हॉट्स अॅपसारखं मोफत असेल. 

अँड्रॉइड वन लॉन्च झालेल्यानंतर गूगलनं नुकताच भारतीय बाजाराला आपली प्राथमिकता बनवलंय. २०१९पर्यंत भारत, चीननंतर जगातील दुसऱ्यानंबरचा सर्वात मोठा स्मार्टफोनचा बाजार बनेल. पण असं वाटतंय, गूगलनं आपला हा निर्णय जरा उशीरानंच घेतलाय. कारण वायबर, वी-चॅट आणि लाइन सारख्या इंस्टंट मॅसेंजर अॅपनं एका खूप मोठ्या लोकसंख्येला आपलं यूजर केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.