तुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय?

तुमच्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्त बॅटरी ड्रेनेज कशामुळे होते? माहिती आहे...

Updated: Jun 22, 2016, 07:10 PM IST
तुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय? title=

मुंबई : तुमच्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्त बॅटरी ड्रेनेज कशामुळे होते? माहिती आहे...

'गूगल क्रोम' या इंटरनेट ब्राउजरमुळे तुमच्या सिस्टमची बॅटरी सर्वात जास्त ड्रेन होते, असा दावा केलाय 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीनं... 

मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार, विंडोज बेस्ड कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राऊजर सिस्टमची बॅटरी सर्वात जास्त खातो... त्यामुळे तुम्हाला वारंवार तुमचा सिस्टम चार्ज करण्याची गरज भासते. 

मायक्रोसॉफ्टनं नुकतंच जगभरातील प्रसिद्ध ब्राउजर्सची टेस्टिंग केली होती. यामध्ये गूगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, ओपेरा आणि मायक्रोसॉफ्टचा ब्राउजर ऐज यांचा समावेश होता. 

'ऐज' ब्राउजर मोझिला फायरफॉक्सपेक्षा ४३ टक्के आणि ओपेरापेक्षा १७ टक्के जास्त बॅटरी बॅकअप देतो.