New Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल

गूगलनं जून महिन्यात जी मेलचं नवं फीचर 'undo' लॉन्च केलं होतं. यामुळं आपण कोणत्याही एडिश्नल एक्सटेंशनच्या यूजर्सनी पाठवलेले मेल अनडू करू शकता. या जबरदस्त फीचर नंतर आता गूगलनं जीमेल यूजर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. 

Updated: Sep 24, 2015, 06:36 PM IST
New Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल title=

मुंबई: गूगलनं जून महिन्यात जी मेलचं नवं फीचर 'undo' लॉन्च केलं होतं. यामुळं आपण कोणत्याही एडिश्नल एक्सटेंशनच्या यूजर्सनी पाठवलेले मेल अनडू करू शकता. या जबरदस्त फीचर नंतर आता गूगलनं जीमेल यूजर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. 

पहिलं फीचर म्हणजे तुम्हाला नको असलेले ईमेल तुम्ही “ब्लॉक” करु शकणार आणि दुसरं फीचर म्हणजे तुम्हाला अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी “अनसबस्क्राईब” ही सुविधा उपलब्ध केली आहे.

आणखी वाचा - तब्बल 17 वर्षांनंतर गुगलनं बदलला आपला लोगो

या नव्या फीचरमुळं जीमेल यूझर्स त्यांना नको असलेले ईमेल ब्लॉक करु शकतील. जीमेल यूझर्सनं त्यांना नको असलेल्या व्यक्तीचे ईमेल ब्लॉक केल्यानंतर ते ईमेल थेट स्पॅम बॉक्समध्ये जाणार आहेत.

जवळपास सर्वच स्मार्टफोन यूझर्स हे न्यूजलेटर्स सबस्क्राईब करतात मात्र काही काळानंतर हे ईमेल त्यांना नकोसे वाटतात, मग यापासून सुटका मिळवायची कशी असा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणूनच जीमेलनं “अनसबस्क्राईब”ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांसाठीही सुविधा असणार आहे. “अनसबस्क्राईब” ही सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. जगभरात 90 कोटी लोक गूगलची सेवा वापरतात. त्यांना या फीचर्सचा उपयोग होणार आहे. 

आणखी वाचा - भारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.