कोण आहे मित्र, कोण आहे शत्रू? सांगणार फेसबूक

तुमची आवडती सोशल वेबसाईट आता तुम्हाला तुमचे मित्र आणि शत्रू ओळखण्यातही तुमची मदत करणार आहे.

Updated: Jul 1, 2014, 07:04 PM IST
कोण आहे मित्र, कोण आहे शत्रू? सांगणार फेसबूक title=

नवी दिल्ली : तुमची आवडती सोशल वेबसाईट आता तुम्हाला तुमचे मित्र आणि शत्रू ओळखण्यातही तुमची मदत करणार आहे.

इस्रायली डेव्हलपर एलिरन यानं ‘फेक ऑफ’ नावाचं एक अॅप्लिकेशन बनवलंय. या अॅप्लिकेशनच्या मदतीनं मुलींना फेसबुकमुळे हे समजू शकेल की कोण त्यांचा मित्र आहे आणि कोण शत्रू?

हे अॅप्लिकेशन कोणत्याही फेसबुक प्रोफाईल किंवा पेजच्या संपूर्ण वर्षभराच्या अॅक्टिव्हिटीजच्या साहाय्यानं एक टेस्ट घेईल आणि त्याचा निकाल 1 ते 10 अंकांच्या रुपात देईल.

या अॅप्लिकेशननं 1 नंबर दिला तर त्याचा अर्थ आहे या व्यक्तीपासून सावधान... आणि जर 10 नंबर दिला तर त्या अर्थ ‘सुरक्षित’ असा आहे.

संपूर्ण वर्षभरात कोणत्याही प्रोफाईलचे फोटो, व्हिडिओ आणि इतर अॅक्टिव्हिचीजला आपल्या मीटरवर मोजून ‘फेक ऑफ’ मुलींना हा विश्वास देतील की त्या फेसबुकवर सेफ आहेत.

‘फेसबुक’ हा सध्याच्या तरुणाईच्या जीवनातील एक अविभाज्य भाग झालाय. अशावेळी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आलीय.

सुरुवातील या अॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागत होते. पण, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्माता एलिरन यानं हे अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय यूजर्स हे अॅप्लिकेशन एका वर्षापर्यंत मोफत वापरू शकतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.