गूगलला टक्कर देणार फेसबुक 'सर्च इंजिन'!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच गूगलच्या सर्च इंजिनला टक्कर देणारं सर्च इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. 

Updated: May 13, 2015, 08:48 AM IST
गूगलला टक्कर देणार फेसबुक 'सर्च इंजिन'! title=

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच गूगलच्या सर्च इंजिनला टक्कर देणारं सर्च इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. 

यामुळे युजर्सला आपलं स्टेटस अपडेट करण्यासाठी वेबसाईट आणि लेख शोधण्यासाठी मदत मिळेल. फेसबुकच्या या नव्या सर्च इंजिनची सध्या चाचणी सुरू आहे. 

वेबसाईट 'टेकक्रंच'नं दिलेल्या माहितीनुसार, फोटो आणि स्थानांना जोडण्यासाठी यामध्ये फिचर्स उपलब्ध आहेत. शिवाय, आयफोन युजर्स एका नव्या 'अॅड ए लिंक' पर्यायाचा वापर करू शकतात.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर फेसबुक तुमच्यासमोर तुमच्या उपयोगाच्या वेबसाईटची सूची जाहीर करेल... ज्याचा वापर तुम्ही करू शकता. इतकंच नाही तर वेबसाईटवर असलेल्या माहितीचा तुम्ही तुमचं स्टेटस अपडेट करण्यासाठीही उपयोग करू शकता.

'अॅड ए लिंक' बटनाच्या वापरानं युजर्स अधिक बातम्या आणइ इतर प्रकाशित माहिती शेअर करू शकतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.