...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र!

तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय. 

Updated: Oct 20, 2015, 08:48 PM IST
...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र! title=

मुंबई : तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय. 

हायटेक इन्स्टिट्यूटच्या काही विद्यार्थ्यांनी एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हॉईस तयार केलंय ज्याच्या मदतीनं अपघात झाल्यानंतर तुम्हाला लगेचच वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकेल.

'एमर्जन्सी रेस्क्यू डिस्पॅच सिस्टम' नावाचं हे डिव्हाईस अंकुश शर्मा, असीम कुमार, अभय कुमार आणि मनीष या विद्यार्थ्यांनी बनवलंय. या डिव्हाईसमध्ये सेन्सर आणि जीपीएसही उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये तुम्ही कोणतेही तीन मोबाईल नंबर नोंदवून ठेऊ शकता. अडचणीच्या वेळी यामुळे तुम्हाला तात्काळ मदत मिळू शकेल.  

हे डिव्हाईस लावून ठेवलेलं वाहन दुसऱ्या वाहनाला धडकलं तर लगेचच सेन्सर आणि जीपीएस अॅक्टिव्ह होतील... आणि लगेचच तुम्ही नोंदवलेल्या तीनही मोबाईल नंबरवर तुमचा मॅसेज तुमच्या सद्य लोकेशनहीत पाठवला जाईल.

हा डिव्हाईस प्रोजेक्ट अखेरच्या टप्प्यात पोहचलाय. कॉलेज प्रशासनानं या डिव्हाईसचं पेटंट बनवण्याचीही प्रक्रिया सुरू केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.