लवकरच, दाखल होतोय जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन!

मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी 'यू टेलिव्हेन्चर्स'नं आपला स्मार्टफोन 'यूटोपिया'चा टीझर प्रदर्शित केलाय. 'यूटापिया' हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सुपरफास्ट स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय. 

Updated: Oct 20, 2015, 08:17 PM IST
लवकरच, दाखल होतोय जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन! title=

मुंबई : मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी 'यू टेलिव्हेन्चर्स'नं आपला स्मार्टफोन 'यूटोपिया'चा टीझर प्रदर्शित केलाय. 'यूटापिया' हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सुपरफास्ट स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय. 

हा स्मार्टफोन मेटॅलिक बॉडीसहीत बाजारात दाखल होणार आहे. त्याच्या कडांवर सध्या एक निळ्या रंगाची लाईटही दिसतेय. 

कंपनीनं मात्र अद्याप या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत गुलदस्त्यातच ठेवलीय. मात्र, हा जगातील सर्वात पॉवरफूल आणि सुपरफास्ट स्मार्टफोन असेल, असं ट्विट कंपनीच्या सीईओंनी केलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.