नवी दिल्ली : दिल्लीच्या एका विद्यार्थ्याला गूगलकडून तब्बल सव्वा करोडोंहून अधिक पगाराची ऑफर मिळालीय. चेतन कक्कड असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
चेतन हा दिल्लीच्या टेक्नॉलॉजिक युनिव्हर्सिटीचा (डीटीयू) विद्यार्थी आहे. चेतनला गूगलनं तब्बल १ करोड २७ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिलीय. उल्लेखनीय म्हणजे हा डीटीयूचाही एक नवा रेकॉर्ड आहे. यापूर्वी या कॅम्पसच्या प्लेसमेंटचा रेकॉर्ड ९३ लाख रुपये इतका होता.
चेतनचे आई-वडील दिल्ली युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून काम करतात. चेतनची आई रीता कक्क़ड या रसायन विभागात कार्यरत आहेत तर त्याचे वडील सुभाष कक्कड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये शिकवतात.
'डीटीयू'मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शेवटच्या वर्षाला चेतन सध्या शिकतोय. २०१६ साली आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो गूगलच्या कॅलिफोर्नियातील ऑफीसमध्ये दाखल होणार आहे. यासाठी चेतन सध्या खूपच उत्सुक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.