आता किराणा-मेडिकलमध्ये एटीएमची सुविधा

सध्याचा जमाना क्रेडिट-डेबिट कार्डचा आहे. पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे सोयीस्कर आणि सुरक्षित असते. मात्र एखाद्या ठिकाणी एटीएम मशीन नसेल तर मात्र चांगलीच पंचाईत होते.

Updated: Nov 20, 2015, 05:10 PM IST
आता किराणा-मेडिकलमध्ये एटीएमची सुविधा title=

नवी दिल्ली : सध्याचा जमाना क्रेडिट-डेबिट कार्डचा आहे. पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे सोयीस्कर आणि सुरक्षित असते. मात्र एखाद्या ठिकाणी एटीएम मशीन नसेल अथवा कार्ड स्वाईपची सुविधा नसेल तर मात्र चांगलीच पंचाईत होते.

या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. पे-वर्ल्ड आणि भारतीय स्टेट बँक मिळून नवी योजना सुरु करणार आहेत. 

यामुळे ज्या ठिकाणी एटीएमची सुविधा नाही तेथे किराणा आणि मेडिकलमधून पैसे मिळण्याची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला पे-वर्ल्डचे अँप डाऊनलोड करावे लागेल. या योजनेंतर्गत तुम्ही 2000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.