नको असलेल्यांना फेसबुक फ्रेन्डलिस्टमधून एका मिनिटात हटवा

फेसबुकवर तुमच्या फ्रेन्डलिस्टमध्ये असे काही लोक असतात, ज्यांच्या पोस्ट तुम्हाला कधीच आवडत नाहीत, किंवा तुमचा मूड खराब करत असतात. अर्थातच अशा लोकांचा आपल्याला आणि आपला त्यांना उपद्रव नको, त्यांची पोस्ट आपल्याला पाहायची नाहीय आणि आपली त्यांना नको, असं वाटतं.

Updated: Sep 16, 2015, 03:25 PM IST
नको असलेल्यांना फेसबुक फ्रेन्डलिस्टमधून एका मिनिटात हटवा title=

मुंबई : फेसबुकवर तुमच्या फ्रेन्डलिस्टमध्ये असे काही लोक असतात, ज्यांच्या पोस्ट तुम्हाला कधीच आवडत नाहीत, किंवा तुमचा मूड खराब करत असतात. अर्थातच अशा लोकांचा आपल्याला आणि आपला त्यांना उपद्रव नको, त्यांची पोस्ट आपल्याला पाहायची नाहीय आणि आपली त्यांना नको, असं वाटतं.
 
मात्र असे फ्रेन्डस भरपूर सारे असले, तर त्यांना एक-एक करून अनफ्रेन्ड करण्यास वेळ लागतो, म्हणून फायरफॉक्सवर GreaseMonkey डाउनलोड करा. यानंतर 'Mass Facebook Friends Deleter' युझर स्क्रिप्ट चालवा आणि जे काही स्क्रीनवर दिसेल, त्याला फॉलो करा, काही मिनिटात नको असलेले फ्रेन्डस लिस्टमधून बाहेर होतील.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फ्रेन्डलिस्टमध्ये ठेवणं धोकादायक आहे. यानंतर अशाच लोकांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारा ज्यांना तुम्ही व्यवस्थित ओळखतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.