आता, तुमच्या मातृभाषेत बनवा तुमचा ई-मेल आयडी!

इंग्रजी येत नाही म्हणून अनेक जणांना ई - मेल आणि संगणक वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ भाषेच्या अडचणीमुळे अनेक जण ई-मेल करायची वेळ आली की दुसऱ्यांच्या ई-मेल आयडीवर अवलंबून असतात. मात्र आता ही अडचण आता दूर होणार आहे. 

Updated: Oct 19, 2016, 01:27 PM IST
आता, तुमच्या मातृभाषेत बनवा तुमचा ई-मेल आयडी! title=

मुंबई : इंग्रजी येत नाही म्हणून अनेक जणांना ई - मेल आणि संगणक वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ भाषेच्या अडचणीमुळे अनेक जण ई-मेल करायची वेळ आली की दुसऱ्यांच्या ई-मेल आयडीवर अवलंबून असतात. मात्र आता ही अडचण आता दूर होणार आहे. 

इंग्रजी अज्ञानामुळे ई-मेलपासून दूर राहिलेल्या भारतीयांना आता त्यांच्या मातृभाषेत ई-मेल आयडी तयार करता येणार आहे. 

'डेटा एक्सजेन' या कंपनीने 12 भारतीय भाषांमध्ये ई-मेल आयडीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटामल डॉट भारत' या सेवेचं अनावरण केलंय. 

ही सेवा सध्या 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलीय. लवकरच 22 भाषांचा टप्पा गाठला जाणार असल्याचं कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलंय. 

भारतीय भाषांसोबतच ही सेवा अरेबिक, रशियन या भाषांमध्येही उपलब्ध आहे. 'डेटामेल डॉट भारत'मध्ये ई-मेल आयडी तयार करण्यासाठी सुरवातीला हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.