मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे.
ज्या ४३ टक्के कंपन्या कर्मचारी भरती करणार आहेत, त्यातील सुमारे ३० टक्के कंपन्या एकूण भरतीच्या २५ टक्के नव्या अर्थात, फ्रेशर उमेदवारांची भरती करणार आहेत.
ही भरती अर्थातच कंपनीतील प्राथमिक पातळीवरील आहे. तर अनेक कंपन्यांना ४ ते ८ वर्षे अनुभव असा मध्यम अनुभव असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. तर, काही कंपन्यांना वरिष्ठ व्यवस्थापन पातळीवरील १, २ आणि ३ क्रमांकासाठीही योग्य व्यक्तीची प्रतीक्षा आहे.