जिओला टक्कर, बीएसएनलचा २४९ रुपयांमध्ये ३०० जीबी डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

Updated: Apr 2, 2017, 07:27 PM IST
जिओला टक्कर, बीएसएनलचा २४९ रुपयांमध्ये ३०० जीबी डेटा  title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. ब्रॉडबॅण्डच्या ग्राहकांसाठी बीएसएनएल महिन्याला २४९ रुपयांमध्ये ३०० जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. याबरोबरच रात्री ९ ते सकाळी ७ आणि रविवारी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

या ऑफरमध्ये ग्राहकांना पहिल्या एक जीबीसाठी दोन एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. तर एक जीबीनंतर एक एमबीपीएसचा स्पीड असेल. बीएसएनएलचं ब्रॉडब्रॅण्ड कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या बीएसएनएल ऑफिसला जावं लागेल किंवा बीएसएनएलचा टोल फ्री क्रमांक 1800 345 1500 वर फोन करावा लागेल.