अँड्रॉईडसाठी व्हॉटसअॅपच व्हिडीओ कॉलिंग बीटा वर्जन

पॉप्युलर इन्स्टट मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर काही दिवसांपासून, व्हिडीओ कॉलिंगची मागणी होत होती. अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर्स व्हॉटस अॅपवर आलं आहे, मात्र हे बीटा वर्जन आहे. बीटा वर्जन म्हणजे पहिल्या प्रायोगिक टप्प्यात ते आहे.

Updated: Oct 25, 2016, 05:03 PM IST
अँड्रॉईडसाठी व्हॉटसअॅपच व्हिडीओ कॉलिंग बीटा वर्जन title=

मुंबई : पॉप्युलर इन्स्टट मॅसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर काही दिवसांपासून, व्हिडीओ कॉलिंगची मागणी होत होती. अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर्स व्हॉटस अॅपवर आलं आहे, मात्र हे बीटा वर्जन आहे. बीटा वर्जन म्हणजे पहिल्या प्रायोगिक टप्प्यात ते आहे.

कंपनीने सध्या हे वर्जन विंडोजसाठी बनवलं होतं, त्यात व्हिडीओ कॉलिंगचं फीचर देण्यात आलं होतं. आता हे फीचर अँड्रॉईड फोनमध्ये देखील येण्य़ास सुरूवात झाली आहे. 

व्हॉटस अॅपच्या ३.१६.३१८ बीट वर्जनमध्ये व्हिडीओ कॉलिंगचं फीचर देण्यात आलं आहे. काही युझर्सने याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. यात व्हिडीओ आयकॉन दिसतोय, काही युझर्सने म्हटलंय हा आयकॉन वेगळा आहे.

ऑडीओ कॉल आयकॉनला टॅप केल्यानंतर दोन ऑप्शन येत आहेत, यात पहिलं  ऑडीओ कॉलिंग, तर दुसरं व्हिडीओ कॉलिंग आहे. याचं इंटरफेस ऑ़डीओ कॉलिंगपेक्षा जास्त वेगळं नाही. कॉल टॅबने कॉलिंगची सुरूवात केली जाऊ शकते.

व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी तुमच्याकडे आणि ज्याला तुम्ही कॉल करत आहात, अशा दोन्ही युझर्सकडे बीटा वर्जन असणे आवश्यक आहे. सध्या तुम्ही तुमचं व्हॉटस अॅप अपडेट करा, तुम्हाला बीटा वर्जन मिळेल मात्र काही दिवसांनी याची परिपूर्ण आवृत्ती देखील येईल. गुगल प्ले स्टोअरकडून हे अपडेट येऊ शकतं.

जर तुम्ही व्हॉटस अॅपचे बीटा टेस्टर असाल तर याचं प्ले स्टोअरला अपडेट तुम्हाला मिळेल. जर नसेल तर व्हॉटस अॅपच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही बीटा टेस्टर होऊ शकतात. जर बीटा टेस्टर नाही व्हायचंय, तर एपीके मीररच्या वेबसाईटला जा आणि आणि तेथून डाऊनलोड करा.