'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!

नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय. 

Updated: Oct 25, 2016, 05:03 PM IST
'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत! title=

मुंबई : नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय. 

नुकतीच, 'गॅलक्सी एस 7 एज' या आपल्या स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची तक्रार एका युझरनं केलीय. हा नवा कोरा स्मार्टफोन आपण रात्रभर चार्जिंगला लावून ठेवला होता. चार्जिंग दरम्यान मोठा आवाज झाला आणि हा स्मार्टफोन फुटलेला पाहायला मिळाला. हा स्मार्टफोन रिपेअर करण दूरच पण पुन्हा हातात घ्यायच्याही स्थितीत राहिलेला नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, ज्या युझरला हा फटका बसलाय त्यानं पहिल्यांदा 'नोट 7' खरेदी केला होता. पण, काही तक्रारींनंतर त्याला तब्बल दोन वेळा आपला 'नोट 7' रिप्लेस करावा लागला. त्यानंतर 'नोट 7'ऐवजी 'गॅलक्सी एस7 एज' घेण्याचा निर्णय त्यानं घेतला होता. त्याचाही आता कोळसा झालाय.

बीग बींचीही तक्रार

सॅमसंगच्या स्मार्टफोनच्या तक्रारींची ही काही पहिली वेळ नाही. खुद्द बीग बी अमिताभ बच्चन यांनीही कंपनीकडे चक्क ट्विटरवरून आपली तक्रार नोंदवली होती. बीग बींकडे असलेल्या 'गॅलक्सी नोट 7'च्या चार्जिंगबद्दल त्यांनी कंपनीकडे तक्रार केली होती. परंतु, हा फोन बंद झाल्यानंतर कंपनीनं त्यांना 'एस 7' हा स्मार्टफोन दिला होता.