अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च

अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.

Updated: Mar 22, 2016, 08:08 AM IST
अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च title=

मुंबई : अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.

आयफोन एसई हा आयफोन-५ प्रमाणे दिसतो. यामध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी आहे तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये ६४ जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. तर ४ इंचची स्क्रिन देण्यात आली आहे.

आयफोन एसई मध्ये ४ के रेकॉर्डीगचा १२ मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. यामध्ये ३ डी टचची सुविधा नसणार आहे.

या फोनची किंमत ३३००० रुपयापासून आहे. २५ मार्च पासून या फोनची विक्री सुरु होणार आहे.