व्हॉट्सअॅपचे नवं फिचर डाऊनलोड केलं का?

 जगात क्रमांक एकचे इनस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एकापाठोपाठ एक नवे फिचर लॉन्च करत आहे. कंपनीने नव्या व्हर्जन 2.12.535 चे नवे अपडेट जारी केले आहे. 

Updated: Mar 21, 2016, 09:53 PM IST
व्हॉट्सअॅपचे नवं फिचर डाऊनलोड केलं का? title=

नवी दिल्ली :  जगात क्रमांक एकचे इनस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एकापाठोपाठ एक नवे फिचर लॉन्च करत आहे. कंपनीने नव्या व्हर्जन 2.12.535 चे नवे अपडेट जारी केले आहे. 

यानुसार एक नवीन फिचर युजर्सला मिळणार आहे.  हे खूप कामाचे फिचर आहे. या पूर्वी व्हॉट्सअॅपने प्रोफाइल सेटिंग्जचा लेआऊट बदलला होता. 

फॉर्मेटे टेक्स्ट

आता चॅटच्या टेक्स्टला बोल्ड किंवा इटालिक करता येणार आहे. तुम्हांला एखाद्या टेक्स्टला बोल्ड करायचे असेल तर त्याच्या पूर्वी आणि नंतर स्टार लावावा लागले. 
उदा. तुम्हांला  Hello ला बोल्ड करायचे असेल तर *Hello* लिहावे लागणार आहे. 

तुम्हांला एखाद्या टेक्स्टला बोल्ड करायचे असेल तर त्याच्या पूर्वी आणि नंतर अंडरस्कोअर लावावा लागले. 
उदा. तुम्हांला  Hello ला बोल्ड करायचे असेल तर _Hello_ लिहावे लागणार आहे.  यापूर्वी असेच फिचर गुगल टॉकमध्ये देण्यात आले होते. 

2.12.510 व्हर्जनमध्ये असे लिहिल्यावर बदललेला टेक्स दिसणार नाही. पण मेसेज रिसीव्ह करणाऱ्याला टेक्स्ट लेअर बदलणारे दिसणार आहे. 2.12.535 व्हर्जनमध्ये हे फिचर सेंडर आणि रिसिव्हर या दोघांना दिसणार आहे. सध्या या नव्या फिचरचा अपडेट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही पण एपीके मिरर वेबसाइटवरून हे अपडेट डाऊनलोड करता येणार आहे.