अॅपलचे दोन नवे फोन लॉन्च

अॅपलने दोन नवे स्मार्टफोन आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस लॉन्च केले आहेत. 

Updated: Sep 10, 2014, 07:24 AM IST
अॅपलचे दोन नवे फोन लॉन्च title=

लंडन : अॅपलने दोन नवे स्मार्टफोन आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस लॉन्च केले आहेत. 

कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी लॉन्च समारोहात सांगितलं, आतापर्यंत तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वात आघाडीवर असलेला आयफोन आम्ही लॉन्च करतोय, याचा आम्हाला आनंद आहे.

आयफोन 6 मध्ये काय आहे विशेष?
दोन्ही फोन आतापर्यंतच्या आयफोन्समध्ये आकाराने मोठे असले, तरी आणखी चपटे आहेत, आयफोन 6 ची स्क्रीन साईझ 4.7 इंच आहे, तर आयफोन 6 प्लस 5.5 इंचाचा आहे.

दोन्ही फोन्समध्ये हाय-स्क्रीन रिझोल्यूशनसाठी रेटिना एचडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

रिसर्च कंपनी आयडीसी ने दिलेल्या माहितीनुसार अॅपलची आंतरराष्ट्रीय विक्री 13 टक्क्यांनी घटली आहे, आता या विक्रीची टक्केवारी 11.7 आहे.

याऊलट अॅड्रॉएडचा बाजार शेअर एप्रिल ते जून दरम्यान 79.6 टक्क्यांवरून 84.7 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे.

लिनोव्ह आणि ह्वावे सारख्या कंपन्यांना सर्वात जास्त फायदा झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.