एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

Updated: Sep 23, 2016, 09:49 PM IST
एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे. एअरटेलच्या ग्राहकांना आता तीन महिन्यांसाठी 30 GB 4G डेटा मिळणार आहे. यासाठी एअरटेलच्या ग्राहकांना 1,495 रुपयांचं रिफील करावं लागणार आहे. 

एअरटेलच्या या प्लॅनवर नजर टाकली तर महिन्याला 500 रुपयांमध्ये 10 GB डेटा ग्राहकाला वापरता येईल. रिलायन्स जीओनं दिलेल्या 50 रुपयामध्ये 1 GB याच किमतीत एअरटेलनं ही ऑफर दिली आहे.

4G मोबाईल हँडसेटवरच ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सध्या हा प्लॅन दिल्ली सर्कलमध्ये सुरु झाला असला तरी लवकरच सगळीकडे या ऑफरला सुरुवात होणार आहे.