मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोशल मीडियावर पाणी अडवणार आहे, असंच सुरूवातीला म्हणता येईल, कारण सोशल मीडियाच्या मदतीने पाणी फाऊंडेशन, राज्यासमोर पाणी अडवण्याचं उदाहरण ठेवणार आहे. यासाठी तीन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे.
यासाठी चांगलं काम करणाऱ्या गावांना बक्षिस देखील दिलं जाणार आहे. याला 'वाटर कप' नाव देण्यात आलं आहे.
ज्या गावातील तरूण पाणी फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देतील, अशा गावातील निवडक तरूणांकडून पाणी अडवण्याच्या तंत्रज्ञानाचे धडे गिरवले जाणार आहे, त्यांना तज्ञ मंडळीकडून मार्गदर्शन होणार आहे.
पाणी फाऊंडेशन यासाठी एक अॅपदेखील लॉ़न्च करणार आहे, पाणी फाऊंडेशन देणगीदारांना त्यांचा पैसा नेमका कुठे लावला जाणार आहे, याची देखील माहिती देणार आहे.
तसेच तुमच्या पैशाचे कोणत्या जागी कसा कायापालट झाला हे देखील दात्यांना पाहता येणार आहे. आमीर खानला या कामी त्यांचे मित्र सत्यजित भटकळ मदत करीत आहेत. सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या या बैठकीला पोपटराव पवार आणि सातऱ्याचे डॉ. अविनाश पोळही उपस्थित होते.