लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 22, 2016, 06:44 PM IST
लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा title=

मुंबई : जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील. 

टच स्क्रीन : जर तुम्हाला टच स्क्रीन गॅजेटची आवड असेल तर तुम्ही टच स्क्रीन लॅपटॉपचा विचार करू शकता. ३०००० पर्यंत टच स्क्रीन लॅपटॉप उपलब्ध आहेत. 

पोर्ट : लॅपटॉप खरेदी करतांना पोर्ट किती आहेत हे तपासून घ्या. एचडीएमआई, यूएसबी, एचडी कार्ड स्‍लॉट हे पोर्ट आहेत का हे नेहमी तपासून घ्या. तुम्ही लॅपटॉप कोणत्या कामासाठी घेणार आहात ही गोष्ट देखील पोर्टसाठी महत्त्वाची ठरते.

वजन आणि डिझाईन : जर तुम्ही प्रवासादरम्यान लॅपटॉप वापरणार असाल तर तुमच्या लॅपटॉपचं वजन महत्त्वाचं ठरतं. अशा वेळेस कमी वजनाचं आणि कमी साईजचा लॅपटॉप तुम्ही घेतला पाहिजे. १२ ते १३ इंचचा लॅपटॉप हा प्रवासादरम्यान वापरतांना उत्तम ठरू शकतो.

ऑपरेटींग सिस्टम : अनेकदा काही लोकं थोडे पैसे वाचवण्यासाठी ओएस नसलेला लॅपटॉप खरेदी करतात. डॉटबेस लॅपटॉप घेतल्यानंतर जर तुम्हाला ओएस इंस्टॉल करता येत नसेल तर ते तुम्हाला महाग पडू शकतं. त्यामुळे ओएस इंस्टॉल असणाराच लॅपटॉप तुम्ही खरेदी करा.

लॅपटॉपचा आकार : जर तुम्ही लॅपटॉप घरी किंवा ऑफिसमध्ये वापरण्यासाठी घेणार असाल तर मोठ्या आकाराचा लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला प्रवासादरम्यान किंवा बाहेर लॅपटॉप वापरायचा असेल तर छोट्या आकाराचा लॅपटॉप खरेदी करा.

फीचर : इंटेल आणि एएमडी मल्टीकोर सीपीयू असलेला लॅपटॉप असणं अधिक चांगलं आहे. यामुळे तुम्हाला चांगली स्पीड मिळेल. त्यासोबतच ३ ते ४ युएसबी स्लॉट असले पाहिजे. 

जुना लॅपटॉप : जुना लॅपटॉप खरेदी करू नका. जुन्या लॅपटॉपचे पार्ट्स जुने झाल्यामुळे कमी स्पीड मिळते. सोबतच तुमचा पर्सनल डेटा हा सुरक्षित राहिलंच याची गँरेटी नाही. 

ऑफर : लॅपटॉप घेतांना ऑफरची वाट पाहु नका. जुने ऑपरेटींग सिस्टीमचे लॅपटॉप विक्री वाढवण्यासाठी दुकानदार अशा ऑफर देतात.  ज्यामध्ये तुमचा काही फायदा असतोच असे नाही.