फोनची ही कव्हर बघून तुम्ही चक्रावाल

 नवीन फोन विकत घेतल्याबरोबर लगेचच आपण त्याचं कव्हरही घेतो. 

Updated: Feb 22, 2016, 01:08 PM IST
फोनची ही कव्हर बघून तुम्ही चक्रावाल title=

मुंबई: नवीन फोन विकत घेतल्याबरोबर लगेचच आपण त्याचं कव्हरही घेतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या फोन्सना जशी डिमांड असते तशीच डिमांड या फोनच्या कव्हरनाही असते. 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी काही अतरंगी कव्हर बनवली आहेत. या कव्हरवर जर बघितली तर तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.

 

ब्राऊन राईस कव्हर

 


खास आयफोनसाठीचं हे कव्हर ब्राऊन राईसपासून बनवलेलं वाटेल. या कव्हरची किंमत आहे 80 डॉलर्स

हँड कव्हर

 


कायम आपल्या पार्टनरचा हात पकडून चालणाऱ्यांसाठी खास हे कव्हर बनवण्यात आलं आहे. 

चिलखताचं कव्हर

मोबाईल पडण्याची भीती तर सगळ्यांनाच असते. तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हे चिलखत कव्हर बनवण्यात आलं आहे. 

मिठाईचं कव्हर

 


कुछ मिठा हो जाये ! हे कव्हर बघितल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल. पण हे कव्हर मात्र खाण्यासाठी नक्कीच नाही. 

इमोजी कव्हर

 


मोबाईलवरून इमोजी पाठवण्याची हौस तशी सगळ्यांनच असते, पण इमोजीचं कव्हरही वापरायची हौस असेल तर हे कव्हर नक्की ट्राय करा

नोस कव्हर

 


हे कव्हर वापरायचं असेल तर नाकात बोट घालून फोनवर बोलायची तयारी ठेवा.

बनाना कव्हर

 

बनाना कव्हर विषयी फारसं न बोललेलच बरं...