16 वर्षांची सुरैया झाली 64 वर्षांची

कॅलेंडरनुसार सुरैया 16 वर्षांची झाली, पण त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

Updated: Feb 28, 2016, 04:01 PM IST
16 वर्षांची सुरैया झाली 64 वर्षांची title=

लखनऊ : कॅलेंडरनुसार सुरैया 16 वर्षांची झाली, पण त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

29 फेब्रुवारी 1952 साली सुरैयांचा लखनऊमध्ये जन्म झाला. त्यांचं आता वय 64 वर्ष झालं आहे. पण लिप इयरमुळे आत्तापर्यंत सुरैया यांना फक्त 15 च वाढदिवस साजरे करायला मिळाले. यावर्षी सुरैया आपला 16 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 

आपला सोळावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुरैय्यांनीही जोरदार तयारी केली आहे. आपल्या नातवांसह त्या आपला हा 16 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. सुरैया इंग्रजी विषयाच्या रिटायर प्रोफेसर आहेत.