www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये ई-रिटेल कंपन्यांमध्य ५० हजारांपर्यंत नोकऱ्या वाढून शकतात. मनुष्यबळ विकास संदर्भात काम करणाऱ्या रँडस्टॅड इंडिया या कंपनीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यांच्यानुसार ई-रिटेल क्षेत्रात आगामी काळात २० ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
ई-कॉमर्सचा वाढणार बाजार वाढणार मागणी
ग्लोबल स्तरावर ई-रिटेल कंपन्या भारतात विस्तार करणार आहे. तसेच यात अनेक कंपन्या नव्याने येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजीची शक्यता आहे.
दुसरी एक एचआर फर्म युनिसन इंटरनॅशनलने तर या क्षेत्रात ३३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. युनिसननुसार, ई-कॉमर्स कंपन्या विस्तार करणार आहेत. तसेच काही पारंपारिक रिटेल कंपन्याही आपला कारभार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणार आहे. त्यामुळेही या सेक्टरमध्ये नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
15,000-50,000 पर्यंत मिळणार नोकऱ्या
याच प्रमाणे जिग्शॉ अकादमीने दिलेल्या माहितीनुसार ई-कॉमर्स क्षेत्रात पुढील तीन वर्षात केवळ डेटा एनालिस्टच्या १५ ते ५० हजारांपर्यंत नोकऱ्या वाढणार आहे.
त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात नोकऱ्यांची वाढ यापेक्षा अधिक असणार आहे. नोकऱ्या वाढणार असल्या तरी ई-कॉमर्स पगारही चांगला मिळणार आहे.
ई-रिटेल कंपनी अमेझॉन डॉटकॉमने या संदर्भात सांगितले की, गेल्या काही दिवसात आमच्या व्यापारात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे अजूनही विस्ताराच्या अधिक शक्यता शिल्लक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.