मुंबई: असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
अधिक वाचा - आपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
जगात असे अनेक पुरुष आहेत, जे महिल्यांच्या समस्या ओळखून असतात... त्या समजून घेतात आणि त्यांना सोबत देतात. पण असे पुरुष फारच थोडे... जाणून घ्या अशा काही महिलांच्या समस्या जे पुरुष कधीच समजू शकत नाही.
१. मासिक पाळीमधील त्रास
महिलांना प्रत्येक महिन्यात याचा सामना करावा लागतो. ही निसर्गानं महिलांना दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे. पण मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा त्रास, चिडचिड हे पुरुष नाही समजू शकत.
२. ब्रेस्ट फीड करणं
आई बनणं जगातील सर्वात मोठं सुख स्त्रीच्या वाट्याला आलंय. पण मुलांना सांभाळणं खूप कठिण काम आहे. अनेकदा मुलांना सार्वजनिक ठिकाणी भूक लागते आणि आईला तिथंच दूध पाजावं लागतं. अशा परिस्थितीत महिलांना खूप संकोच वाटतो. पण महिलांची ही समस्या पुरुष समजू शकत आहे.
३. कपडे
अनेक महिला अशा असतात ज्यांना पारंपरिक वस्त्र घालणं आवडत नाही आणि याविरुद्ध अशा अनेक महिला आहेत ज्यांना वेस्टर्न ड्रेस घातल्यानं त्रास होतो. पण अनेकदा अशी परिस्थिती येते की, दुसऱ्याच्या आनंदासाठी त्यांना आपल्या मनाविरुद्ध ते कपडे घालावे लागतात.
४. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणं
घर आणि ऑफिस एकाचवेळी सांभाळण्याची कला महिलांमध्ये असते. ती सोप्पी गोष्ट नाही. अनेक महिलांना हे सर्व एकटीनं सांभाळावं लागतं. त्यांना मुलांच्या होमवर्कपासून तर ऑफिसमधील आपला प्रोजेक्ट सर्व सांभाळावं लागतं. हे खूप कठिण काम आहे, जे पुरुष समजू शकत नाहीत.
५. स्वत:साठी वेळ
प्रत्येक व्यक्तीला स्वत:साठी काही वेळ हवा असतो. पण घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळता-सांभाळता एक स्त्री आपल्यासाठी वेळ काढूच शकत नाही. अनेकदा त्यामुळं तणाव निर्माण होतो. चिडचिड वाढते. महिलेची ही समस्या फार कमी पुरुष समजून घेतात.
अधिक वाचा - लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.