24 कॅरेट सोन्यानं सजला iPhone 6 आणि iPhone 6+

जर आपण अॅपल आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा फोन आहे, असं समजत असाल. तर आपण चुकताय. खरंतर चीनच्या एका कंपनीनं या बहुचर्चित फोनला 24 कॅरेट सोन्यानं मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवलंय.

Updated: Jan 11, 2015, 07:18 PM IST
24 कॅरेट सोन्यानं सजला iPhone 6 आणि iPhone 6+ title=

मुंबई: जर आपण अॅपल आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा फोन आहे, असं समजत असाल. तर आपण चुकताय. खरंतर चीनच्या एका कंपनीनं या बहुचर्चित फोनला 24 कॅरेट सोन्यानं मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवलंय.

चीनची कंपनी NavJackनं iPhone 6 आणि iPhone 6 प्लस फोनचं गोल्ड प्लेटेल वर्जन लॉन्च केलंय. हा फोन कंपनीच्या लिमिटेल अॅडिशन अंतर्गत उपलब्ध होईल. गोल्ड प्लेटेड फोनची मागची बाजू कार्बन फायबरनं फर्निश असेल. कंपनीनं फोनच्या फ्रंटमध्ये गोरिल्ला ग्लास-3 पण लावलाय.

फोनचे फीचर्स आणि इतर हार्डवेअरमध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाहीय. कंपनीनं फोनची किंमत अजून जाहीर केलेली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.