तिरूवनंतपुरम : तिरूवनंतपुरमच्या गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या तीन विद्यार्थ्यांनी एक कार तयार केली आहे. ही साधी कार नसून ती एका लीटरमध्ये २०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.
तिरूवनंतपुरमच्या बरतोन हिल तेथील गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले, की हे एक अद्भूत इनोव्हेशन आहे. याचा प्रचार इंधनची कमतरता आणि तेलाच्या वाढत्या किंमतीला ध्यानात घेऊन करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे या नमुन्याला गुरूवारी, १५ जानेवारीला फिलिपिन्स येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय इंधन दक्षता स्पर्धेत शेल इको मॅरेथॉनमध्ये पाठविण्यात आले. ही स्पर्धा २६ फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान होणार आहे.
प्रोजेक्ट टीमचे प्रमुख बिबिन सागाराम यांनी सांगितले की, या कॉम्पिटिशनसाठी केरळमधून एकमेव एन्ट्री आहे. या कॉम्पिटिशनसाठी १६ देशांच्या १२० संघानी भाग घेतला आहे.
ही गाडी एक जीएक्स३५ इंजिनद्वारा चालते. यात हलक्या वजनांची सामुग्री, उन्नत एरॉडाइनॅमिक तंत्रज्ञान तसेच अत्यंत दक्षतेसाठी उन्नत ट्युनिंगचा वापर करण्यात आला आहे.
या गाडीचा सांगाडा तयार करताना गोल्फच्या चेंडूची प्रेरणा घेतली आहे. तो अत्यंत एरॉडाइनॅमिक आहे. या गाडीचे वजन केवळ ५० किलो आहे. या स्पर्धेत दोन विद्यार्थी रोनिथ स्टेनले आणि एस. विष्णू प्रसाद यांच्या शिक्षकांनीही भाग घेतला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.