महिलांनो सुंदर दिसायचयं तर करा भाज्यांचा वापर

महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरत असतात. परंतु त्यांच्या ऐवजी जर नैसर्गिक वा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या प्रसाधनांच्या वापर करावा.

Updated: Mar 27, 2013, 12:21 PM IST

www.24taas.com, मुंबई
महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरत असतात. परंतु त्यांच्या ऐवजी जर नैसर्गिक वा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या प्रसाधनांच्या वापर करावा. ते अधिक फायदेशीर, टिकाऊ आणि उपकारक ठरत असते. कारण कृत्रिम प्रसाधनांमध्ये असणार्‍या रसायनांचा आत अभाव असतो. म्हणूनच आपल्याला सहज उपलब्ध असणार्‍या आपल्या दैनंदिन आहारात सामील असणार्‍या भाज्यांचा वापर करून आपण पुढील प्रसाधने तयार करू शकतो.
त्वचा उजळ व कांतिमान बनवायाची असेल, तर प्रत्येकी अर्धा टी-स्पून मध, अंड्यातील पांढरी सफेदी व अर्धा टेबल स्पून गाजराचा रस हे पदार्थ एकत्र कालवून त्यांची पेस्ट चेहर्‍यास लावावी. १५/२० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. जर उन्हाने त्वचेवर राप चढला असेल, तर सॅलडची पाने उकळून त्याचे पाणी गाळून थंड करावे व ते त्वचेवर लावावे.

जेथे जेथे त्वचा सनटॅन झाली असेल, त्यावर काकडीच्या चकत्या कापून लावाव्यात. जर नुसताच राप नसून त्वचा काळपटही पडली असेल, तर लिंबू व काकडी यांचा रस एकत्र करून घ्यावा व स्वच्छ कापसाने डोळ्यांत जाऊ न देता सगळीकडे लावावा.