आता मॅटरनिटी लीव्ह होणार सहा महिन्यासाठी

केंद्र सरकार बाळांतपणाची रजा तीन महिन्यांवरून सहा महिने करण्याच्या विचारात आहे.  याच बरोबर बोनस पगार मिळण्यासाठी मुलभूत पगारातही वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे. 

Updated: Jul 22, 2015, 12:47 PM IST
आता मॅटरनिटी लीव्ह होणार सहा महिन्यासाठी title=

नवी दिल्ली : केंद्र सरकार बाळांतपणाची रजा तीन महिन्यांवरून सहा महिने करण्याच्या विचारात आहे.  याच बरोबर बोनस पगार मिळण्यासाठी मुलभूत पगारातही वाढ करण्याचाही सरकारचा विचार आहे. 

एंम्पॉलॉयमेंट कायद्यात यासाठी बदल करण्यात येणार असल्याचेही संकेत आहेत. कामगार कायद्यातही आमुलाग्र सुधारणा आणण्याचा सरकारचा इरादा आहे.

सध्याच्या कायद्याप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना १२ आठवड्यांची मॅटरनिटी लीव्ह मिळते. इतर काही कंपन्या अधिक दिवस किंवा इतर सुविधा देते. 

महिला आणि बालविकास मंत्रालय यावर खूप दिवसांपासून काम करत आहेत. मॅटरनिटी लीव्ह १२ आठवड्यांवरून २४ आठवड्यांवर करण्यासाठी कामगार संघटना तसेच कर्मचाऱ्यांबरोबर बोलणी चालू आहेत.

ही सूट महिला कर्मचाऱ्यांना फक्त पहिल्या दोन मुलांपर्यंत मर्यादित असणार आहे. तिसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी १२ आठवड्यांचीचं सुट्टी घेता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.