जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं

Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. 

पुजा पवार | Updated: Nov 19, 2024, 12:24 PM IST
जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं  title=
(Photo Credit : Social Media)

Indian Cricket Team : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा (BCCI) माजी अध्यक्ष राहिलेला सौरव गांगुली (Sourav Ganguli) याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रात विराटनंतर पुढचा क्रिकेटमधला किंग म्हणून यशस्वी जयस्वालचं (Yashavi Jaiswal) नाव घेतलं गेलं मात्र सौरव गांगुलीला तसं वाटतं नाही. गांगुलीच्या मते विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) हा भारतीय क्रिकेटचा पुढचा 'किंग' असेल. पंत रेड बॉल क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतरचा सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल असं मत गांगुलीने Rev Sportz शी बोलताना व्यक्त केलं. सध्या त्याच हे स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सौरव गांगुलीने ऋषभ पंतबद्दल स्वतःच मत व्यक्त केलं. त्याने म्हटले की, 'पहा अजून पंतला व्हाईट बॉल क्रिकेटशी पूर्णपणे जुळवून घेण्याची गरज असली तरी तो रेड बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकामध्ये ज्या इनिंग्स त्याने खेळलेल्या आहेत यामधून त्याने सिद्ध केलंय की तो रेड बॉल क्रिकेटमध्ये या पिढीचा सर्वात सर्वोत्कृष्ट टॅलेंट आहे. विराटनंतर भारताचा पुढील सर्वोत्कृष्ट टेस्ट फलंदाज हा पंतच असेल'. 

हेही वाचा : IPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी

 

काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतने बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये चांगली फलंदाजी केली होती. या काळात खेळलेल्या पाच टेस्ट सामन्यांमध्ये पंतने जवळपास 422 धावा केल्या, यावेळी त्याची सरासरी ही 46.88 तर स्ट्राइक रेट 86.47  होता. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पंतने शतकीय खेळी केली होती. यावेळी त्याने संकटात असलेल्या भारतीय संघाला मोठ्या धावा करून तारले होते. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पंतची दमदार खेळी : 

ऋषभ पंत हा टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सीरिजला लवकरच सुरुवात होणार आहे. यात सीरिजमध्ये ऋषभ हा भारताचा महत्वाचा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून ऋषभ पंतचं नाव घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या दोन सीरिजमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळलेल्या टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला होता.  यावेळी सुद्धा सीरिज जिंकून टीम इंडिया हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.

बॉर्डर गावस्‍कर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी