महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा

अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 

Updated: Sep 19, 2015, 11:56 AM IST
महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा title=

नवी दिल्ली : अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये महिला पात्र दाखविण्याचा प्रयत्न झालाय. आजुबाजूचे लोक कशा नजरेने पाहतात. तसेच काहीजण शुटींग करतात. यांना काही वाटत नाही, अशी शेरेबाजीही करतात. महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे. पण सार्वजनिक ठिकाणी महिला लघुशंकेला गेली तर लोकांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.