तुमचा कोमल चेहरा या पद्धतींनी अजिबात साफ करू नका...

चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला नक्कीच ताजतवानं आणि फ्रेश वाटत असेल ना... पण, जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं... आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसण्याऐवजी आणखीनच काळवंडलेला दिसू शकतो. काय आहेत या चुका.... टाकुयात एक नजर...

Updated: Sep 18, 2015, 06:06 PM IST
तुमचा कोमल चेहरा या पद्धतींनी अजिबात साफ करू नका... title=

मुंबई : चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला नक्कीच ताजतवानं आणि फ्रेश वाटत असेल ना... पण, जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं... आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसण्याऐवजी आणखीनच काळवंडलेला दिसू शकतो. काय आहेत या चुका.... टाकुयात एक नजर...

- तुम्ही ज्या पाण्यानं चेहरा धुताय ते पाणी फार गरम किंवा फारच थंड नसेल याची काळजी घ्या.... खूपच थंड किंवा खूप गरम पाणी तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहचवू शकतं. त्यामुळे नेहमी कोमट पाण्यानं चेहरा साफ करा.

- चेहरा साफ करण्यासाठी जर तुम्ही स्क्रबरचा वापर करत असाल तर हलक्या हातांनीच स्क्रब करा... जास्त जोरात घासल्यानं चेहऱ्यावर रगडल्याच्या खुणा दिसू शकतात. 

- मेकअप काढण्यासाठी चेहऱ्या धुण्याऐवजी तुम्ही पहिल्यांदा चेहऱ्या कापसानं साफ करून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्यानं साफ करा. मेकअप सरळ पाण्यानं धुतल्यानं मेकअपचे कण त्वचेच्या छिद्रांत घुसून बसतात आणि ते बंद होतात... ज्यामुळे तुम्हाला पिंपल्सची समस्या जाणवू शकते. 

- चेहरा खूप जास्त वेळा साफ करणंही योग्य नाही. चेहरा पुन्हा पुन्हा धुतल्यानं चेहऱ्यावरचं तेज कमी होतं.

- चेहरा धुतल्यानंतर खरखरीत टॉवेलनं जोरात खरडवू नका... हलक्या हातांनी चेहऱ्यावरचं पाणी टिपून घ्या.

- चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर मात्र अजिबात करू नका. जर तुमचा फेशवॉश संपला असेल तर कोणत्याही रासायनिक पदार्थानं चेहरा साफ करण्यापेक्षा तुम्ही केवळ बेसन पिठानं चेहरा साफ करू शकता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.