www.24taas.com, लंडन
व्यायामाद्वारे धुम्रपानाची सवय सुटू शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. व्यायामाच्या रुपात धुम्रपानाच्या व्यसनावर एक चांगला उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांच्या मते जास्त व्यायाम केल्यामुळे निकोटिन घेण्याची इच्छा कमी होत जाते. आपलामूडही प्रसन्न राहातो.
डेली मेलच्या बातमीनुसार, अक्सेटर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यावर खूप संशोधन केलं आहे. यासाठी 19 क्लिनिकल परीक्षणं केली गेली. यातूनच त्यांच्या लक्षात आलं, की जास्त व्यायाम केल्यामुळे निकोटिनची सवय कमी होऊ लागते. सिगरेट, तंबाखू यांमध्ये निकोटिन असतं. या पदार्थाचं व्यसन व्यायामामुळे कमी होऊ शकतं.
यासंदर्भात संशोधन करणाऱ्या ग्रुपच्या प्रमुख एड्रिन टेलर या म्हणाल्या, “व्यायामामुळे निकोटिनच्या व्यसनावर विजय मिळवता येतो. हा इलाज कायमस्वरुपी होऊ शकतो.” यासाठी केल्या गेलेल्या प्रयोगांणध्ये अतिधुम्रपान करणाऱ्या व्यक्तिंकडून अधिक व्यायम करवून घेतला. या व्यायामात सायकलिंग, भराभर चालणं इत्यादी व्यायाम करवून घेतले.