पत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!

‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 30, 2013, 04:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
इटालियन संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पत्नीबरोबर प्रतारणा करणाऱ्या पुरुषांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलंय की कुणाचं तरी हृदय तोडून आपलं हृदय दुसऱ्याच्याच हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. संशोधनकर्त्यांनी केलेल्या संशोधनानुसार, घरात पत्नी असताना ‘बाहेरवाली’च्या प्रेमात गुंतणाऱ्या पुरुषांना हा धोका खूप जास्त प्रमाणावर आहे... आणि याचा तीव्र परिणाम म्हणजे मृत्यू, असं निदर्शनास आलंय.
डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, असं होण्यामागे कोणतंही एक कारण शोधलं जाऊ शकलं नाही परंतु, यामागे अनेक कारणांचा अंतर्भाव असतो. म्हणजेच, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पत्नीबरोबर प्रतारणा करून आपलं हृदय इतर स्त्रियांना देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो स्वत:ला अपराधी, दोषी मानतो.... याचा सरळ सरळ परिणाम त्यांच्या हृदयावर होतो. किंवा एखादा पती चोरून-लपून आपल्या प्रेमिकेसोबत खाजगी क्षण उपभोगत असतो, तेव्हा त्याच्या हृदयावरचा ताण वाढतो.
‘यूनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरेंस’च्या संशोधनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विवाहबाह्य संबंध, आपल्या जोडीदाराशी प्रतारणा आणि पुरुषांचा व्यवहार आणि त्याचा परिणाम याचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.