www.24taas.com, झी मीडिया, लंडन
स्तन कँसर रुग्णांमध्ये प्रत्येक तीन जणांमध्ये एका ७० पेक्षा जास्त वयाच्या महिलेचा समावेश असतो, असं नुकतंच आढळून आलंय. `पब्लिक हेल्थ इंग्लंडट`नं (पीएचई) सोमवारी ही माहिती जाहीर करत एक मोहीम सुरू केलीय. या मोहिमेद्वारे वयस्कर महिलांना याबाबत जागृत केलं जाईल.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वर्षी स्तन कँसरनं होणाऱ्या मृत्यूचा ५० टक्के आकडा हा वयस्कर महिलांचा असतो, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.
पीएचईच्या अभियान `बी क्लिअर ऑन कँसर`च्या माध्यमातून वयस्कर महिलांना कोणत्याही पद्धतीची गाठ तयार होत असेल, तर त्याबाबत जागृत राहायला हवं आणि नियमित रुपात डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. मोहिमेद्वारे आगामी १६ मार्चपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांतून स्तन कँसरसंबंधी जागृकतेसाठी जाहिराती प्रसारित आणि प्रकाशित केल्या जातील.
पीएचईच्या म्हणण्यानुसार, ७० पेक्षा जास्त वय असणाऱ्या दोन तृतीयांश महिलांना असं वाटतं की स्तन कँसरचा धोका सर्व महिलांना समानच असतो. पण खरं म्हणजे, महिलांना वाढत्या वयानुसार स्तन कँसरचा धोकाही वाढतो.
इंग्लंमध्ये प्रत्येक वर्षी ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या जवळजवळ १३,५०० महिलांना स्तन कँसर असल्याचं समोर आलंय. वयस्कर महिलांच्या स्तनांच्या बदलत्या आकार आणि बनावटीमुळे हा धोका अधिकच वाढतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीलाच स्तन कँसरची लक्षणं दिसल्यानं या आजारावर इलाज आणि रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता बळावते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.