www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काम, क्रोध, लोभ, मोह, ईष्या या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांपासून दूर ठेवतात. हा स्वभाव दोष आहे. या गोष्टी काही वेळा औचित्यनं समोर येतात तर काहींचा स्वभावच या गोष्टींनी भरलेला असतो. या स्वभावदोषांमुळे फक्त नात्यांतच फरक येतो असं नाही तर यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वासही गमावता.
कोणत्याही नात्याचा पाया म्हणजे विश्वास आणि प्रेम... यामुळेच आपल्या व्यक्तीला समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. पण, कोणत्याही व्यक्तीच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता लागणं खूप कठिण असंत पण शास्त्राच्या दृष्टीतून पाहिलं तर हे काम फारसं कठिणही नाही. त्यासाठी आत्मविश्वास ही एक महत्त्वाची गोष्ट. योग्य आणि अयोग्य यांतील फरक ओळखून व्यवहाराच्या कलेत कुशल व्यक्ती आत्मविश्वास सहजगत्या प्राप्त करतो. त्यामुळे जीवनात नात्यांना सांभाळणंही सोपं होतं.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार सुरू असतील किंवा एखादी चुकीची गोष्ट करण्याची इच्छा असेल तर ते अप्रत्यरित्या का होईना पण ते बाहेर प्रकट होतं. यासाठी शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या मनात चुकीचे विचार असतील तर ते कसे ओळखावे यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. यासाठी काही गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या योग्य किंवा चुकीच्या आकांक्षा जाणून घेण्यासाठी त्याच्या देहबोलीवर लक्ष द्या...
आकार – उंची आणि जाडी
संकेत – विविध अवयवांद्वारे केले जाणारे हावभाव
गती – खूप तेजीत किंवा सुस्त शरीर
चेष्टा – व्यक्तीच्या हालचाली आणि कृत्य
बोलणं – योग्य शब्द वापरणं आणि आवाजातील उतार-चढाव
डोळे – डोळ्यांची गती-हालचाल, डोळ्यांतील भाव
चेहरा – पूर्ण चेहऱ्यावरचे हावभाव
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.