www.24taas.com,रत्नागिरी
कोकणात मंगळवारपासून होळीच्या सणाला सुरुवात झालीय. पारंपरिक पद्धतीनं साज-या होणा-या कोकणातल्या होळीला चाकरमान्यांचंही आगमन झालंय. संध्याकाळी चारनंतर गावागावात हुडा उभा करण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. कोकणातल्या होळीच्या हुड्याजवळ जाऊन भाविक दरवर्षी नवस बोलतात.
बा देवा, बारा गावच्या, बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या म्हाराजा, आज सांगना करुक कारन म्हाराजा, आज शिमग्याचो सण, पण तरी पण गावाक येवन धूळवड करायची सोडून जी लोका देशा-परदेशात आपल्या हाफिसात पडून असात त्यांचो भलो कर म्हाराजा, लोकांची कामा, प्रमोशना, लग्ना अडकून पडली असात त्याची लवकर व्यवस्था लाव म्हाराजा. आमच्यावर जर कोनी वायट करनी,फुरसा फिसार, दातकसार केल्लली आसात तर तू कायता बघून घे म्हाराजा, असे गाऱ्हाने म्हणून हे नवस नंतर फेडले जातात.
नवस बोलणं आणि फेडणं यासाठी आज गावागावात गर्दी झाली होती. हा उत्सव पाच दिवस चालतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या होळी उत्सवाला शंभर-दोनशे वर्षांपूर्वीती पंरपरा आहे. यावर्षीच कोकणातील होलिकोत्सवातील वैशिष्ट्य म्हणजे अनेकांनी वृक्ष तोडीला छेद दिलाय. रत्नागिरीत शिमग्याची खरा उत्साह दिसून येतो. पालख्या नाचवल्या जातात. तर काही जण विविध सोंग घेतात.