www.24taas.com, आसनगाव
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली. यावेळी स्टेशनमास्तरांनाही धक्काबुक्की करण्यात आली. काल संध्याकाळीही ठाण्यात लोकलवर दगडफेक करण्यात आली होती.
गेला आठवडाभर सुरू असलेल्या गोंधळामुळे संतापलेल्या प्रवाशांची सहनशीलता संपत आल्याचं हे चिन्हं मानलं जातंय. दरम्यान, मध्य रेल्वेच्या लोकल लेट असण्याचा सिलसिला आजही सुरूच आहे. ठाण्यातल्या कामामुळे स्लो मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावलाय.
आणखी आठव़डाभर हा गोंधळ कायम राहण्याची शक्यता आहे. ठाणे-कळवा आणि ठाणे-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर अनेक सिग्नल बदलले आहेत. त्याची मोटरमनना सवय होईपर्यंत वाहतूक हळूच राहील, असं रेल्वेतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर लोकलच्या प्रवासातली ३ मिनिटं कमी होतील असा दावाही करण्यात येतोय...