भराडीदेवीच्या जत्रौत्सवाला सुरुवात...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 14, 2013, 01:34 PM IST

www.24taas.com, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालीय.
मुंबई ठाणे आणि परिसरातून लाखो चाकरमानी भाविक आंगणेवाडीत दाखल झालेत. पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्यात. दर्शनाची रांग जवळपास एक किलोमीटर लांब असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या काही वर्षांत आंगणेवाडीत राजकीय नेत्यांचा सहभाग वाढू लागलाय. यंदाही अनेक दिग्गज यात्रेला येणार आहे. भाविकांनी आंगणेवाडीचा परिसर फुलून गेलाय.

दर्शनासाठी तब्बल सहा रांगा लागल्यात. भाविकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्षही इथं उपस्थित आहे. उद्योगमंत्री नारायण राणे, नितीन गडकरी विनोद तावडे अशी मंडळी इथं हजेरी लावणार आहेत. त्यामुळे गर्दीचा ताण आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षाही व्यवस्था चोख ठेवण्यात आलीय.