मुंबई: ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो. याची उत्सुकता अनेकांना असेल.
विमानामध्ये यासाठी एक खास टाकी बसवण्यात आली असते. या टाकीमध्ये टॉयलेटमधली सगळी घाण साठवली जाते. यानंतर विमान जेव्हा आपल्या नियोजित स्थळी पोहोचोतं, तेव्हा तिथे या घाणीचा निचरा करण्यासाठी एक विशेष ट्रक ठेवण्यात आला असतो. या ट्रकमध्येही एक टाकी ठेवण्यात आलेली असते.
विमानाच्या टाकीतली सगळी घाण या ट्रकमध्ये टाकली जाते, आणि विमानातली टाकी स्वच्छ केली जाते. विमानातली ही टाकी साफ केल्यानंतरच हे विमान पुढच्या प्रवासासाठी पाठवलं जातं.