SMS पाठवा फक्त दोनशे... SMSवरही आली बंधने !

मोबाईलवरून एसएमएस पाठवणं म्हणजे एक व्यसनच तरूणाईला जडलं आहे. मात्र आता याच एसएमएसवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली आहेत.

Updated: Dec 4, 2012, 09:02 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मोबाईलवरून एसएमएस पाठवणं म्हणजे एक व्यसनच तरूणाईला जडलं आहे. मात्र आता याच एसएमएसवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली आहेत. एका सिमकार्डमधून एका दिवसात केवळ २०० एसएमएस पाठवण्याचे ` ट्राय ` ने घातलेले बंधन उठवण्याचा आदेश ` टीडीसॅट ` ( टेलिकॉम डिस्पुट्स सेटलमेंट अॅण्ड अपिलेट ट्रिब्युनल ) या दूरसंचार लवादाने दिल्याने मोबाइल कंपन्यांनी सुटकेचा श्वास सोडला खरा पण , सोमवारी सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने एसएमएसची मर्यादा तूर्त तरी कायम राहिली आहे .
` ट्राय ` ने ` एसएमएस ` वर आणलेल्या मर्यादेला युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ` टीडीसॅट ` कडे आव्हान दिले होते. त्यावर सुनावणीनंतर ही मर्यादा ` टीडीसॅट ` ने उठवली . या आदेशाला ` ट्राय ` ने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे न्या . जी . एस . सिंघवी यांच्या खंडपीठापुढे सोमवारी झालेल्या सुनावणीत आदित्य ठाकरे यांना कोर्टाने नोटीस धाडली . तसेच , याप्रकरणी सहा आठवड्यांत बाजू मांडण्यास सांगितले आहे . या सुनावणीतच सुप्रीम कोर्टाने ` टीडीसॅट ` च्या आदेशाला स्थगिती दिली .