‘सॅमसंग एस-5’नं प्रस्थापित केला विक्रीचा नवीन रेकॉर्ड

सॅमसंगनं नुकताच ‘सॅमसंग एस 5’ लॉन्च केलाय. लॉन्चिंगनंतर अवघ्या 25 दिवसांत सॅमसंगनं मोबाईलचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 13, 2014, 02:14 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
सॅमसंगनं नुकताच ‘सॅमसंग एस 5’ लॉन्च केलाय. लॉन्चिंगनंतर अवघ्या 25 दिवसांत सॅमसंगनं मोबाईलचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय.
मोबाईल वेबसाईट ‘जीएसएम अरेना’नं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ‘गॅलक्सी एस-5’ या स्मार्टफोनचे केवळ 25 दिवसांत एक कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेलेत. त्यामुळे, या मोबाईलनं सगळ्यात तेजीत विकला जाणारा स्मार्टफोन म्हणून ख्याती मिळवलीय.
गॅलक्सी एस-5नं एस-4चा आपलाच रेकॉर्ड दोन दिवसांच्या अंतरानं तोडलाय. एस-5 ची घोषणा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोनामध्ये झाली होती. 9 एप्रिलपासून या मोबाईलची अधिकृत विक्री सुरू झाली. या फोनची भारतातील किंमत 51,500 रुपये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.