www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मायक्रोसॉफ्टचा दोन सिमकार्डधारक स्मार्टफोन ‘ल्युमिया 630’ भारतात लॉन्च करण्यात आलाय. मोटो जी, एचटीसी डिझायनर तसंच सॅमसंगचा डुओज यांना टक्कर देणारं हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे.
नोकिया हँडसेटचा ताबा मिळवल्यानंतर दोनच आठवड्यांत मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतात दोन सिमकार्ड बाजारात आक्रमक स्वरुपात उतरण्याचा निर्णय घेतलाय. हे क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
कंपनीनं मीडियाला पाठवलेल्या निमंत्रणात, दोन सिमकार्ड धारक स्मार्टफोनचं नाव ‘ल्युमिया 630’ असू शकतं. याबद्दल कंपनीनं गेल्याच महिन्यात सॅनफ्रान्सिस्कोमध्ये घोषणा केली होती.
हा बाजारात विंडोज ८.१ या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत पहिलाच मोबाइल असणार आहे. या फोनमध्ये इतर सर्व सुविधांबरोबरच आपल्या आरोग्यावर नजर ठेवणारे एक विशेष सन्सर आणि अॅपही देण्यात आले आहे.
आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी सध्या बाजारात अनेक गॅजेट उपलब्ध आहेत. हे सर्व गॅजेट मोबाइलशी जोडले गेले की आपल्याला आपण दिवसभरात किती चाललो, आपण किती खायला हवे किंवा दिवसभर खाण्यामुळे किती कॅलेजरीज मिळाल्या आहेत, याबाबत माहिती मिळत असते. यासाठी आपल्याला हे गॅजेट वेगळे बाळगावे लागते. पण लुमिया ६३०मध्ये देण्यात आलेल्या सेन्सर मुळे आपण मोबाइल खिशात ठेवला की तो आपोआप आपल्या आरोग्यवर नजर ठेवून असतो. याच एक फिटनेस अॅप दिले आहे. या अॅपद्वारे आपल्याला आपला रिपोर्ट सातत्याने मिळत असतो. विंडोज ८.१ या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा हा पहिलाच मोबाइल असून यामध्ये मेमरी कार्डच्या मदतीने आपण १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकणार आहोत. बारा हजारपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये एवढी मेमरी देणारा हा एकमेव फोन असणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या या स्वस्त मोबाइलमुळे बाजारात पुन्हा एकदा स्वस्त फोनमध्ये युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
फोनमध्ये देण्यात आलेला वर्ल्ड फ्लो की-बोर्ड हा सगळय़ात जलद असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनवरून जलद संदेश टाइप करून जागतिक विक्रम नोंदविण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे. या शिवाय या फोनमध्ये 'इंटलिजन्स'चा पर्याय देण्यात आला आहे. संदेश टाइप करताना आपल्याला विविध पर्याय सुचविले जातात. जसे की आपण सचिन हे नाव टाइप केले की खाली येणाऱ्या शब्दकोशात पुढचा शब्द तेंडुकर असा असतो. यामुळे संदेश टाइप करताना आपल्याला मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.