www.24taas.com, नवी दिल्ली
कार्बन मोबाइल्सने आज देशातला पहिला क्वाडफोर स्मार्टफोन कार्बन टाइटेनियम-1 स्मार्ट फोन सादर करण्याची घोषणा केली. या फोनमध्ये क्वलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे.
कंपनीने दिलेल्या माहितनुसार कार्बन टाइटेनियम-1 मध्ये क्वाडफोर प्रोसेसर ४.५ आयपीएस क्यू एसडी डिसप्ले आणि अँड्रॉइड जेली बीन जोडण्यात आलंय. कार्बन स्मार्ट एस-1, वेब ब्राउजिंग, गेम्स, युजर इंटरफेस या सगळ्यांनी ऍडवान्स बनला आहे. तर इनबिल्ट एडरेनो 203 जीपीयू, एचडी रेझोल्यूशन डिसप्ले आणि इतरही ग्राफिक ऍप्लिकेशन्सचा सपोर्ट आहे.
भारतीय बाजारात या फोनची किंमत ११००० रुपये इतकी आहे. कार्बन मोबाइलचे कार्यकारी संचालक शशीन देवसरे म्हणाले, “क्वॉलकाम स्नॅपड्रॅगन क्वाडफोर सीपीयू प्रोसेसर असं आत्याधुनिक तंत्र वापरण्यात आलं आहे. भारतीय बाजारपेठेतला हा सर्वांत अत्याधुनिक फोन असेल.”