`गुगल सर्च`मध्ये नरेंद्र मोदींचा पहिला नंबर!

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं सोशल नेटवर्किंग साईट्सवर लोकप्रिय ठरत असतानाच गुगल या सर्च इंजिनवरही मोदी सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2013, 11:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं सोशल नेटवर्किंग साईट्सवर लोकप्रिय ठरत असतानाच गुगल या सर्च इंजिनवरही मोदी सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत.
गुगलवर नरेंद्र मोदींच्या नावाने सर्वाधिक सर्च केले जात असून या स्पर्धेत मोदींनी राहूल गांधी, मनमोहन सिंग, अरविंद केजरीवाल या सर्वांवर त्यांचा क्रमांक लागत आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार सर्च इंजिनवर नरेंद्र मोदी या नावाने सर्वाधिक सर्च केले जात आहे. राहूल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि अरविंद केजरीवाल यांच्या नावाने सर्च करण्याचे प्रमाण लक्षणीय असले तरी त्यांचे स्थान गुगलवर मोदींनंतर आहे. गुगलने एक सर्वेक्षण केले असून यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे १६० जागांचे भवितव्य बदलू शकते.
सर्वेक्षणानुसार शहरी भागातील ३७ टक्के मतदार ऑनलाइन आहेत. त्यापैकी ४५ टक्के मतदार मतदान कोणाला करायचे याचा निर्णय इंटरनेटवर उमेदवाराची माहिती सर्च करुन घेतात. तर ४२ टक्के मतदारांना कोणाला मतदान करायचे हे शेवटपर्यंत ठरवता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.