फिशिंग अ‍ॅटॅकपासून संरक्षण देणारं नव सॉफ्टवेअर

अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरबाबत जागृत असतो. आपल्या संगणकाला अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे प्रोटेक्शन आहे का? याची आपण खात्री करून घेतो. वेळोवेळी अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करतो. मात्र तरीही मालवेअरचा हल्ला आपल्या संगणकावर होतो. आता याच फिशिंग अ‍ॅटॅकपासून संरक्षण देणारं सॉफ्टवेअर भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे.

Updated: Feb 6, 2014, 07:14 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरबाबत जागृत असतो. आपल्या संगणकाला अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे प्रोटेक्शन आहे का? याची आपण खात्री करून घेतो. वेळोवेळी अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करतो. मात्र तरीही मालवेअरचा हल्ला आपल्या संगणकावर होतो. आता याच फिशिंग अ‍ॅटॅकपासून संरक्षण देणारं सॉफ्टवेअर भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे.
संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ मालवेअरला नष्ट करणाऱ्या सॉफ्टवेअरचा शोध लागला आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी अँड डिजिटल फोरेन्सिक या संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या सॉफ्टवेअरमुळे संगणकावर ताबा घेणाऱ्या अनोळखी व्यक्तींना संगणकापासून दूर ठेवणे शक्य होणार आहे.
झोंबीज नावाच्या मालवेअरला देखील या नव्या सॉफ्टवेअरमुळे नष्ट करता येणार आहे. मालवेअरमुळे जगभरातील लाखो संगणक बंद पडतात. इंटरनेटवरील बॉटनेट जाळ्यात झोंबीज हा मालवेअर असतो. या मालवेअरला नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात येतात. हे प्रयत्न यशस्वी होतातही पण झोंबीज मालवेअर बनवणारे पुन्हा नव्याने तंत्रज्ञान विकसित करतात. त्यामुळे संगणकाचा ताबा घेणारा झोंबीज मालवेअर आणि बॉटनेट तयार होतात.
नवीन तंत्रज्ञानाद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून तात्काळ झोंबीज मालवेअर नष्ट करण्यात येईल. आणि संगणक बॉटनेटपासून मुक्त राहील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.