सनीच नाही तर कतरिना, करिनाही व्हायरस
www.24taas.com, मुंबई
जर तुम्ही ‘सनी लिओन’चे हॉट पिक्स पाहण्यासाठी नेटवर सर्च करत असाल तर सावधान… कारण या नावाच्या मागे आहे कंप्यूटर व्हायरस. फक्त सनीच्याच नावामागे नाही तर कतरिना, करीना, प्रियांकाच्याही नावातही आहे व्हायरस...
कंप्यूटर सिक्योरिटी कंपनी ‘लुबना मार्कर’च्या नेर्तृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासात व्हायरसची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली की सनी लिओन व्यतिरिक्त इतर सेलिब्रिटींचेही नाव सर्च केल्यानंतरही व्हायरस ओपन होऊ शकतो.
तसं पाहायला गेलं तर जास्त धोकादायक नाव तर सनीचंच आहे. सेलिब्रिटींच्या नावावरून जास्त पसरणारा व्हायरस ९.९५ टक्के सनीच्या नावात आहे, त्यानंतर कतरिना(८.२५ टक्के), करीना कपूर(६.६७ टक्के), प्रियांका चोप्रा(६.५ टक्के), बिपाशा बासु(५.५८ टक्के), आणि पूनम पांडे(४.२५ टक्के).
गुगल, याहू, बिंग या सोशल नेटवर्किंग साइट्सवर दोन महिन्याच्या संशोधनानंतर ही महत्वाची माहिती हाती आली. सेलिब्रिटींची नावे वापरून हॅकर्स तुमच्या कंमुप्यूटरमधील तुमची खासगी माहिती हॅक करण्याची शक्यता आहे. तुमची बॅंकेचे डिटेल्स एका क्षणात हॅकर्सपर्यत पोहोचू शकतात. सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून हॅकर्स जगाच्या कुठल्याही टोकातून तुमची माहिती हॅक करू शकतात. तर कोणाचेही हॉट पिक्स पाहण्याआधी जरा काळजी घ्या.