पाहा गूगलची बिना ड्रायव्हरची कार

गूगलने स्वयंमचलित कारची निर्मिती केली आहे. या कारला ड्रायव्हरची गरज नसणार आहे.

Updated: May 29, 2014, 09:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, म्यूयॉर्क
गूगलने स्वयंमचलित कारची निर्मिती केली आहे. या कारला ड्रायव्हरची गरज नसणार आहे.
फक्त सुरू करणे आणि थांबणे यासाठीच तुम्हाला बटणचा वापर करता येणार आहे.
यापूर्वी दुसऱ्या इतर कंपनीने बनवलेल्या स्वयंचलित कारमध्ये सुधारणा करण्याचं काम गूगलकडून केलं जात होतं.
गूगलने बनवलेल्या बिना ड्रायव्हरच्या या कारमध्ये थांबवण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी एक बटन आहे, मात्र नियंत्रणासाठी स्टेअरिंग आणि ब्रेक नाहीय.
गूगलची ही कार पाहिल्यानंतर वाटतं की ही, या कारचा आकार इतर शहरी कारसारखा आहे.
ही कार समोरून अतिशय सुरक्षित करण्यात आली आहे, यामुळे लोकांमध्ये स्वयंमचलित कारचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा विश्वास निर्माण होणार आहे.
गूगलचे सह संस्थापक सर्गे ब्रिन यांनी कॅलिफोर्नियात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.