www.24taas.com, वृत्तसंस्था, सॅन फ्रान्सिस्को
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
फेसबुकने अठरा वर्षांखालील मुलांवरील निर्बंध उठविले असून, यापुढे अल्पवयीन मुलांनाही फेसबुकचा पूर्णपणे वापर करता येणार आहे. अल्पवयीन मुले सोशल नेटवर्किंगचा सर्वांत मोठा वापर व प्रयोग करत असतात. कोणताही विषय असला तरी ते सोशल नेटवर्किंगवर मोकळेपणाने मांडत असतात.` व्हॉट्स अप व स्पॅनचॅटने मोबाईल ऍप्लिकेशन तयार करून, अल्पवयीन मुलांना स्वातंत्र दिले आहे. यामुळेच फेसबुकने आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
दरम्यान, काही दिवस अल्पवयीन मुलांना इशारा दिला जाईल. मात्र, काही दिवसानंतर तो सुद्धा बंद केला जाणार आहे, असे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकवर यापूर्वी अल्पवयीन मुलांना केवळ आपले मित्र आणि मित्रांचे मित्रांशीच स्टेट्स अपडेट, फोटो व व्हिडिओ शेअर करता येत होते. यापुढे फेसबुकवरील कोणत्याही सभासदांबरोबर ते सर्व प्रकारची माहिती शेअर करू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना ऑप्शनमध्ये जाऊन पब्लिकला सिलेक्ट करावे लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.