www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
एका कम्प्युटरनं आपण एक मशिन नसून जिवंत व्यक्ती असल्याचं सिद्ध करून दाखवलंय... त्यामुळे जगभर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. रशियामध्ये हा कम्प्युटर बनवला गेलाय.
रशियामध्ये एका कम्प्युटर प्रोग्रामिंग टीमनं एक प्रोग्राम तयार केलाय. याच प्रोग्रामनं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला जेव्हा त्यानं स्वत:ला कम्प्युटर प्रोग्राम नाही तर 13 वर्षांचा मुलगा असल्याचं सिद्ध केलं. व्यक्ती आणि कम्प्युटरमध्ये फरक स्पष्ट करणारी ट्युरिंग टेस्ट या प्रोग्रामनं पास करून दाखवलीय. हे आजवर कोणत्याही तंत्रज्ञानाला शक्य झालं नव्हतं. 13 वर्षांचा मुलगा बनलेला हा कम्प्युटर प्रोग्राम आपण ओडेस्सा इथला रहिवासी सांगतो.
हा प्रोग्राम बनविणाऱ्या टीमच्या म्हणण्यानुसार, व्यक्ती आणि कम्प्युटर्समध्ये फरक स्पष्ट करण्यासाठी केली जाणारी टेस्ट एक ‘लँडमार्क’ समजली जाते. पण, या टेस्टलाही या नव्या कम्प्युटर प्रोग्रामनं फोल ठरवलंय. तर दुसरीकडे बुद्धिजीवींना आता एक अनामिक भीती सतावू लागलीय. या प्रोग्रामच्या माध्यमाचा सायबर जगात दुरुपयोग होण्याची चिंता त्यांना सतावतेय.
ट्युरिंग टेस्ट म्हणजे काय?
कम्प्युटर जगातील तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐलन ट्युरिंग यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही कम्प्युटरनं या टेस्टला पास केलं तर तो कम्प्युटर स्वत:चा विचार तयार करू शकतो आणि वापरू शकतो. रशियामध्ये तयार झालेल्या या कम्प्युटर प्रोग्रामनं यूजीन गुस्टमन लंडनच्या रॉयल सोसायटीत ‘यूनिव्हर्सिटी ऑफ रिडिंग’च्या तज्ज्ञांनी घेतलेल्या टेस्टमध्ये पास होऊन दाखवलंय. ज्यामुळे, 33 टक्के तज्ज्ञांना ही खात्री पटलीय की हा एक कम्प्युटर नसून एक व्यक्ती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.